नागपूर शहर: पोलीस आहे की गुंड , वाहतूक पोलिसाच्या मारहाणीत वृद्ध फळविक्रेत्याचा कानाचा पडदा फाटला
नागपूर शहरातील दही बाजार उडान पुलाजवळ रस्त्यावर फळा विकणाऱ्या 65 वर्षीय मोहम्मद फारूक नावाच्या वृद्धाला वाहतूक पोलीस निरीक्षक संजय खंडारे यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना 3 नोव्हेंबरच्या रात्री घडली. खंडारे यांनी वृद्धाच्या कानशिलात मारल्याने त्यांच्या कानाचा पडदा फाटला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.