नाशिक: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींकडून नाशिकला भव्य मोर्चा
Nashik, Nashik | Nov 5, 2025 आश्वासनांची पूर्ती करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत नाशिक मधील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता महाराष्ट्राचा नेपाळ होऊ द्यायचा नसेल तर बेरोजगारांच्या हाताला काम द्या अशी एक मुखी मागणी यावेळी हजारो युवकांनी केली प्रशिक्षण पूर्ण होऊन 15 महिने होऊन गेले तरी अजूनही हाताला काम नाही राज्यात एक लाख 34 हजार प्रशिक्षणार्थी वाऱ्यावर आहे म्हणून तात्काळ प्रशिक्षणार्थींना कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली.