समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा:ग्रामस्थांना करण्यात आले मार्गदर्शन
समुद्रपूर :तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, मुख्याध्यापक रमेश वाघमारे, ग्रामसेवक संतोष पुरकाम, ग्रामपंचायत सदस्य प्रणालीताई वांढरे, सुनिताई वाघाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लायू संबोधन चित्रलिपी उपस्थित ग्रामस्थांना दाखविण्यात आली.