समुद्रपूर: गिरड टेकडीच्या मागील भागाला आगीचा विळखा, सुदैवाने जीवितहानी टळली असून आगीचे कारण अस्पष्ट
गिरड येथील बाबा फरीद दरगाह टेकडीच्या मागील भागाला अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून वनसंपदाचे नुकसान केले आहे.सुदैवाने या आगीत कोणत्याही जिवितहानी झाली नाही. २३ एप्रिलला दुपारी २ वाजताच्या सुमार गिरड टेकडीचा मागील भागाला अचानक आग लागली यावेळी पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून टेकडीचा मागील भागाला आपल्या कवेत घेतले घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी रवाना केले.