सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 25 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतील तेलीपुरा येथे भर वस्तीत देह व्यापाऱ्याचा अड्डा चालविणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.