अकोला: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने संताप; क्रांतिकरी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
Akola, Akola | Nov 12, 2025 अकोल्यात क्रांतिकरी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पातुर, नंदापूर, सोनखास, घोंगा, बोरगाव खुर्द, जवळा, दुधलम, डापकी जहागीर, वाळकी, दोडकी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. संघटनेने शेतकऱ्यांची नाव व गट नंबरसह यादी सादर केली असून, २० तारखेपर्यंत मदत न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल.