भोकरदन: धावडा येथे जनावराच्या गोट्याला अचानक आग लागून चार दुधाळ म्हशींचा होरपळून मृत्यु, तर मका, ऊस पिक जळून खाक
आज दिनांक 29 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा येथे काल दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी जनावराच्या गोठ्याला आग लागून गोठ्यात बांधलेल्या चार दुधाळ म्हशींचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर मका व उसाचे पीक सुद्धा जळून खाक झाले आहे, यामध्ये अमोल देवकर या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.