अकोला जिल्ह्यातील अमानतपूर ताकोडा गावातील रहिवाशी भोसले यांच्या शेतात 7 फूट लांबीचा अजगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये एकाच धावपळ उडाली होती नंतर शेतातील शेतमजुरांनी सर्प मित्र सुरज इंगळे यांना संपर्क साधला सर्पमित्र सुरज इंगळे यांनी या अजगराचा रेस्क्यू करून त्याला सुखरूप बाहेर काढले व जवळच असलेल्या एका जंगलात त्याला सोडून देण्यात आले हा सर्व थरार पाहून शेतकरी घाबरले होते मात्र सर्पमित्र यांनी अजगर पकडून सर्वांना भयमुक्त केले.