नागपूर ग्रामीण: मुकेश काळे यांचा आरोप: 'स्कूल ऑफ स्कॉलर'च्या बांधकामामुळेच बेलतरोडी परिसरात साचतोय पाणी!
बेलतरोडी येथील 'स्कूल ऑफ स्कॉलर'ने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करून शाळा भवन बांधल्यामुळेच परिसरात पाणी साचत आहे, असा आरोप नगर पंचायत बेसा पिपळाचे सार्वजनिक बांधकाम सभापती मुकेश काळे यांनी केला आहे. शाळेतील पाणी समस्येबाबत प्राचार्य, शिक्षक आणि पालकांच्या शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर ते बोलत होते