चिखलदरा: स्कायवॉकचे काम कासवगतीने;चिखलदराचे स्वप्न अडथळ्यांच्या भोवऱ्यात अडकले;तत्काळ काम करण्याची मागणी
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरामध्ये २०१९ पासून सुरू असलेला स्कायवॉक प्रोजेक्ट अद्याप पूर्णत्वास न पोहोचता अडथळ्यांची शर्यत सुरूच आहे.परवानगी,तांत्रिक अडचणी आणि कामातील विलंबामुळे पर्यटक व स्थानिक व्यावसायिक त्रस्त झाले आहे.स्कायवॉकच्या मध्यभागी खाईतून सपोर्ट द्यावा,अशी आयआयटी दिल्लीची शिफारस झाल्याने पुन्हा वनपरवानगीची अडचण निर्माण झाली असून काम आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता वाढली,