अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दहेगाव बंगला येथे रविवारी दुपारी ४ वाजता घडली. योगेश परभणे (वय ३५, रा. भेंडाळा, ता. गंगापूर) असे जखमीचे नाव आहे. योगेश हे वाळूजकडून भेंडाळा येथे दुचाकीने जात असताना हा अपघात झाला. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली.