दिग्रस: शहरातील चार ठिकाणी सापांचे रेस्क्यू, दुर्मिळ जाळ रेती सापासह इतर सापांना वाईड फॉर नेचर क्लबच्या सदस्यांकडून जीवदान
दिग्रस शहरातील चार विविध ठिकाणी साप आढळल्याची माहिती मिळताच वाईड फॉर नेचर क्लबच्या सदस्यांनी तात्काळ धाव घेत सापांचे यशस्वी रेस्क्यू केले. आज दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान राबविलेल्या या मोहिमेदरम्यान दुर्मिळ जाळ रेती सापासह इतर सापांना कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडण्यात आले. सदस्यांनी पकडलेले साप वन विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक सानिध्यात सोडून दिले. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये वाईड फॉर नेचर क्लबच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले जात आहे.