उत्तर सोलापूर: काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन...
ज्येष्ठ नेत्या तथा काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 86 वर्ष होते. निर्मलाताई ठोकळ दोन वेळा आमदार राहिले आहेत. सुरुवातीला त्या नगरसेविका होत्या. त्यानंतर 1972 ते 76 दरम्यान त्या जुन्या शहर दक्षिणमधून काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेवर निवडून आल्या. नंतर त्यांचे भावजी ॲड बाबासाहेब भोसले हे 1982 मध्ये मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्या राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधान परिषदेवर गेल्या होत्या.