21 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन कळमना हद्दीतील साईनगर येथे राहणाऱ्या शांताबाई चिंचे वय 95 वर्ष यांना डोळ्याने दिसत नसल्याने त्यांना रूम मधील इलेक्ट्रिक हीटर चा करंट लागला ज्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन कळमना येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे