जालना: डॉ. राजेंद्र गाडेकर यांना आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड-2026’
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सेवाकार्य
Jalna, Jalna | Jun 3, 2026 जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांना आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड-2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. बुधवार दि. 3 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या सन्मानामुळे जालना जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे.अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर पीस, यूएसए आणि ग्लोरीयस ग्लोबल सोशल फाउंडेशन सहभागी होते.