भोकरदन: मा.आ.चंद्रकांत पाटील दानवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसर चौकात डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाला केला पुष्पहार अर्पण
आज दिनांक 14 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे याप्रसंगी शरदचंद्रजी पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरपरिषदेचे पदाधिकारी नगरसेवक व समाज बांधव उपस्थित होते.