जालना: पत्नीचा गळा आवळून खून; आरोपी पतीला १० वर्षांची सक्तमजुरी.
जालना जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; १० हजारा
Jalna, Jalna | May 29, 2026 पत्नीचा गळा आवळून खून; आरोपी पतीला १० वर्षांची सक्तमजुरी. जालना जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; १० हजारांचा दंडही ठोठावला.. आज दिनांक 29 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : पत्नीचा रुमालाने गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच आरोपीस १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी दोन वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे.