देगलूर: सततच्या नापीकीला कंटाळून विषारी औषध पिलेल्या शेतकऱ्याचा धन्वंतरी हाॅस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू;देगलुर पोलीसात नोंद
Deglur, Nanded | Oct 9, 2025 देगलूर शहरातील धन्वंतरी हॉस्पिटल येथे दिनांक 6 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास यातील मयत नामे चंद्रकांत नागोराव माडपते वय 40 वर्ष व्यवसाय शेती राहणार शहापूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड यांनी सततच्या नापिकीला कंटाळून कोणत्यातरी विषारी औषध पिऊन उपचारादरम्यान मरण पावले याप्रकरणी खबर देणार सुरेखा माडपते यांनी दिलेल्या खबरीवरून देगलूर पोलीस स्टेशन येथे आज सायंकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फड हे आज करीत आहेत.