माजलगाव: केसापुरी जवळ ऑटो रिक्षा आणि इंडिकाचा भीषण अपघात एक ठार तर एक गंभीर जखमी
माजलगांव तालुक्यातील केसापुरी जवळ असलेल्या देशमुख पेट्रोल पंपा जवळ सादोळ्याकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. यावेळी ऑटो रिक्षाला समोरून येणाऱ्या इंडिकाने धडक देत ऑटो रिक्षा (एम.एच. 23 एक्स 3349) चालकास फरफरट नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असल्याचं समोर येत आहे. घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.