सातारा: उत्तर प्रदेशात पैगंबर यांच्या बॅनरवरून दाखल केलेल्या गुन्ह्यांचा मुस्लिम समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध
Satara, Satara | Sep 19, 2025 छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत, उत्तर प्रदेशातील पैगंबर यांच्या बॅनर वरून दाखल केलेल्या गुन्ह्यांचा, सातारा जिल्ह्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला, कानपूर उत्तर प्रदेश येथे पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त, काढलेल्या शांततामय शोभा यात्रेत, मुस्लिम बांधवांनी आय लव मोहम्मद असे बॅनर झळकावले होते, परंतु दुर्दैवाने तेथील प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने सुमारे 25 जणांवर गुन्हा दाखल केल्याचा निषेध केला.