गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्याच २७ वर्षीय सुनेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका ६८ वर्षीय वृद्धाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २७ वर्षीय महिलेचा हा दुसरा विवाह आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती कामावर गेल्यानंतर घरामध्ये कुणीही नसल्याची संधी साधून ६८ वर्षीय सासरा तिच्या बेडरूममध्ये शिरला.