जालना: जालन्यात सिटी बससाठी ३० इलेक्ट्रिक बसची मागणी; महापौरांच्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
Jalna, Jalna | Apr 7, 2026 आज दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात सिटी बस सेवा सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याची माहिती माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी दिली. काल झालेल्या जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी आक्रमक भूमिका घेत, जालना शहरात सिटी ब