वेंगुर्ला: पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखा जनता दरबार घेण्यासाठी हिम्मत लागते : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी
सत्तास्थानाच्या काळात ज्यांनी कधीही जिल्हास्तर, तालुकास्तर ना ग्रामस्थरावर जनता दरबार घेतला नाही त्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नये. कारण पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखा जनता दरबार घेण्यासाठी जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याला न्याय देण्यासाठी, संवाद करण्यासाठी हिम्मत असावी लागते असा अप्रोधिक टोला सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिका-यांना लगावला.