वडवणी: कुंडलिका नदीला महापूर आल्याने वडवणी तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला
Wadwani, Beed | Sep 15, 2025 वडवणी तालुक्यातील डोगर पट्टा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या अवकाळी पावसामुळे कुंडलिका नदीला मोठा पूर आला असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषत: चिखलबीड, कोठारबन, खडकी देवळा आणि आजूबाजूची खेडी नदीच्या पाण्याने वेढली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूरामुळे ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. गावांमधील दळणवळण पूर्णपणे खंडित झाल्याने शालेय विद्यार्थ्यांपासून शेतकरी, नागरिकांपर्यंत सर्वांनाच अडचन निर्माण