जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने 'जीवनदान महाकुंभ २०२६' अंतर्गत जिल्हा सेवा समिती भंडारा तर्फे ठाणा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 10 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता दरम्यान करण्यात आले, ज्याचे उद्घाटन भाजप जिल्हा महामंत्री कल्याणी तिरपुडे यांच्या हस्ते जगद्गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाले. मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल असून ज्या दानामुळे एखाद्याचे प्राण वाचतात, ते रक्तदानच सर्वश्रेष्ठ पुण्य असल्याचे...