स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा जागर करीत 7 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित 'स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025' हा उपक्रम यशस्वी केला. सकाळी ठीक 4.30 वा सुरू झालेल्या हाफ मॅरेथॉनमधील सर्वाधिक 32 किमी. अंतराच्या मुख्य गटात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: धावपटू म्हणून सहभागी होत नागरिकांसमवेत स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत ही हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.