जालना: जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जय्यत तयारी; अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण निश्चित जाहिर
Jalna, Jalna | Oct 13, 2025 जालना जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असून, जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडत काढून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सोमवार, दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता रोजी एकूण 57 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहिर करुन ते निश्चित करण्यात आले. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी गट राखीव ठरले असून, महिलांसाठीही आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेचे आठ गट राखीव करण्यात आले आहेत.