भोकरदन: अनवा ते पंढरपूर या मानाच्या दिंडीची टाळा मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे अनवा येतो प्रस्थान
आज दिनांक 1 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील अनवा येथील मानाचे दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने टाळ मृदंगाच्या गजरात हातात भगव्या पताका घेत प्रस्थान झाले आहे,जालना जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अनवा येथील संत सद्गुरु विठोबा दादा महाराज दिंडी ही पंढरपूरच्या मार्गस्थ झाली असून या दिंडीला सुमारे 272 वर्षाची परंपरा आहे,6 जिल्ह्यातून 450 किलोमीटरचा पायी प्रवास करून 22 दिवसात ही दिंडी पंढरपूर येथे दाखल होत असते आणि ती आज प्रस्थान झाली.