भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मध्ये स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने अभिषेक कारेमोरे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करताच, शहरात बंडखोरीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, कारेमोरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवण्यासाठी आमदारांचे दोन खंदे समर्थक असलेले गट आता एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर युवक शहर अध्यक्ष सागर गभर्ने हे पक्षाचे अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष यासीन छवारे यांच्या नेतृत्वा