हिंगोली: नगर पालिका निवडणुकीत शनिवारीही स्वीकारले जाणार नामनिर्देशन पत्र
हिंगोली : नगर पालिका निवडणुकीचा सार्वत्रिक कार्यक्रम जाहिर झाला असून नामनिर्देशनपत्र सादर करावयाचा कालावधी सुरु झाला आहे. १५ नोव्हेंबर शनिवार रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी आदेश काढले आहेत.राज्यात नगर परिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असून नामनिर्देशनपत्र सादर करावयाचा कालावधी सुरु झाला आहे. निवडणुक कार्यक्रमामध्ये रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही असे नमुद केले आहे. त्यामुळे १५ नोव्हें