सेनगाव: कार्यकर्त्यांवर दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्या,प्रहारचे तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज तहसीलदार सेनगाव यांना निवेदन सादर करून प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांच्या सह अन्य दोघांवर दाखल करण्यात केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष बालाजी गायकवाड यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. 26 नोव्हेंबर रोजी विजय वानखेडे,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे व प्रवीण मते यांनी संविधान दिन पंचायत समिती कार्यालयामध्ये का साजरा केला नाही याचा जाब विचारून आंदोलन केले होते.