मानगाव: रायगड मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली
Mangaon, Raigad | Oct 29, 2025 शिंदे शिवसेनेकडून शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम सध्या रायगड मध्ये सुरू आहे मात्र या उपक्रमावर थेट अजित दादांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्याचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आलाय.त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उपक्रमांतर्गत छापण्यात आलेल्या बॅनरवर तटकरे कुटुंबाचा फोटो नसल्याने हा राग सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनाआल्याने त्यांनीच हा कार्यक्रम थांबण्यास भाग पाडल्याचा आरोप जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केलाय