पालघर: आंबोली येथे तीन ते चार अज्ञातांनी एकाला केली मारहाण; गुन्हा दाखल
आंबोली येथील मेहताब खान हे त्यांच्या घराच्या शेजारी उभे असताना कारमधून तीन ते चार अज्ञात आरोपी त्यांच्या जवळ आले. खान यांच्याशी भांडण करून त्यांना या आरोपींनी ठोशाबुक्याने मारहाण केली, एका आरोपीने दगड उचलून त्यांच्या डोक्यात मागून वार केला. या प्रकरणी खान यांच्या तक्रारीवरून कासा पोलीस ठाण्यात तीन ते चार अज्ञात आरोपीं विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118 (1), 352, 351 (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.