सेनगाव: महसूल पथकाची धडक कारवाई, वाळू उपसा करणाऱ्या यंत्रासह 5 लाखाचा मुद्देमाल जप्त,ब्रह्मवाडी शिवारातील घटना
महसूल पथकाच्या वतीने सेनगांव तालुक्यातील ब्रह्मवाडी शिवारात धडक कारवाई करून पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह वाळू उपसा करणारे यंत्र ताब्यात घेऊन आरोपीवर सेनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रह्मवाडी शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणारे यंत्राच्या मदतीने वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये भरली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती त्यावरून मंडळ अधिकारी देविदास इंगळे यांच्या पथकाने कारवाई केली.