अंजनगाव सुर्जी: येवदा येथे पोलिसांनी पकडला बोलेरो पिकप; सापडले ९ गाढव; केला गुन्हा दाखल
येवदा पोलिसांना काल रात्री १० वाजताच्या सुमारास एक बोलेरो पिकअप पकडला असून त्यामध्ये ९ गाढव आढळून आले.पोलिसांनी कसून चौकशी केली असता ते गाढव चोरी केल्याचे उघड झाले.येवदा येथील आठवडी बाजारात फिर्यादी पुरण अभिमान खडे (वय ४७, इंदीरा नगर, येवदा) व त्यांच्या साथीदाराच्या मालकीचे ९ गाढव चोरीला गेले होते.ही घटना २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता घडली होती. फिर्यादी आणि त्याचे इतर साथीदार आठवडी बाजारात गाढव शोधायला गेले होते मात्र त्यांना त्यांचे गाढव दिसून आले नाही.