वर्धा: टीईटी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज:पुर्वतयारी बाबत मार्गदर्शन व आढावा बैठक
Wardha, Wardha | Nov 19, 2025 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि.23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 10 केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे नियोजन व आढावा घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशासनातर्फे परीक्षेच्या अनुषंगाने पुर्वतयारी करण्यात आली आहे.