मोहाडी: निलज येथे विनापरवाना रेती वाहतूक करणारा टिप्पर करडी पोलिसांच्या ताब्यात, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील निलज येथे दि. 30 ऑक्टोंबर रोज गुरुवारला रात्री 10 वा.च्या सुमारास करडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई पांडुरंग येळणे हे आपल्या पोलीस पथकासह पेट्रोलिंगवर असताना त्यांनी विनापरवाना रेती वाहतूक करणारा टिप्पर क्र. MH 40 CT 9002 या वाहनावर कारवाई करत सदर टिप्पर व त्यातील 10 ब्रास रेती असा एकूण 50 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टिप्पर चालक रामचंद्र जगनाडे, टिप्परमालक प्रदीप कारेमोरे आणि क्लिनर श्याम बाभरे यांच्याविरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.