अलिबाग: किहीम सरपंच प्रसाद गायकवाड यांना अश्लिल शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार पुत्र व नातवावर गुन्हा दाखल
Alibag, Raigad | Apr 19, 2025 रायगड जिल्ह्यातील किहीम सरपंच प्रसाद गायकवाड उर्फ पिंट्या यास बामनसुरे येथे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर उर्फ राजा ठाकूर,सम्राट राजेंद्र ठाकुर (दोघे रा.सातीर्जे, ता. अलिबाग) या दोघांनी शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रिती प्रसाद गायकवाड( वय-34 वर्षे, बामणसुरे, पोलिस पाटील रा.मु.पो.चोंढी, ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी मांडवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.