साक्री: आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ दहिवेल येथे काढण्यात आला मूक मोर्चा तर शहर कडकडीत बंद
Sakri, Dhule | Sep 26, 2025 नंदुरबार येथे झालेल्या जय बाबा वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ विविध संघटना व गावातील तरुणांनी शुक्रवारी २६ सप्टेंबर रोजी दहिवेल शहर दिवसभर बंद ठेऊन घटनेचा निषेध व्यक्त करीत जयेश वळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तर दोशींवर कठोरात कठोर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी एकमुखी मागणी करण्यात आली या वेळी गावातील समाजाच्या महिलांसमवेत ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.तर उपस्थितांकडून पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.