चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवेंदिरन यांनी आज दि 16 डिसेंम्बर ला 12 वाजता भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, रुग्णसेवा, औषधसाठा, मनुष्यबळ तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची पाहणी केली.