पातुर: अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला दिला चोप तर पोलिसांनी केली अटक!
Patur, Akola | Nov 11, 2025 पातुर तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. माहितीप्रमाणे, आरोपीने शाळेतच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. पीडितेने घरी जाऊन कुटुंबीयांना प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे