आजाराला कंटाळून ७५ वर्षीय वृद्ध इसमाने गळफास घेतल्याची घटना रविवार १४ डिसेंबर रोजी सकाळी गंगाखेड तालुक्यातील धारखेड शिवारात घडली. सदर प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.