जालना: जालना जिल्ह्यातील दामिनी पथक अधिक सक्षम व प्रभावी करण्याची मागणी
Jalna, Jalna | May 27, 2026 जालना जिल्ह्यात ग्रामीण भागासह जालना शहरात महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या “दामिनी पथका”ला अधिक सक्षम व प्रभावी करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. शीतलताई बारोटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामीण भागासह जालना शहरात शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा ठिकाणी महिला छेडछाड, अत्याचार व इतर अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठ