पुर्णा: देऊळगाव दुधाटे येथे गोदावरी नदीपात्रात स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन
Purna, Parbhani | Oct 30, 2025 परभणी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी विहीर, गायगोठा, यांचे कामे पूर्ण करून जवळपास चार वर्षे पूर्ण झाली तरी देखील कुशल बिल अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले नव्हते 2021 पासून प्रलंबित असलेल्या कुशल बिल असलेल्या शेतकऱ्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुर्णा तालुक्यातील मोजे देऊळगाव दुधाटे येथे गोदावरी नदी पात्रामध्ये आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जलसमाधी आंदोलन केले.