जननी सुरक्षा योजनेअंतर्गत निधीच्या वापराबाबत आलेल्या तक्रारीनंतर अमरावती येथील चौकशी समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपास केला. या वेळी तत्कालीन अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले. समिती अध्यक्ष डॉ. रमेश बनसोड यांनी सायंकाळी 7 वाजता सांगितले की, सर्व संबंधितांचे स्पष्टीकरण घेण्यात आले असून उर्वरित बयानानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येईल. सदर प्रकरणाचा तपास सुरू असून समितीचा अंतिम अहवाल अद्याप सादर व्हायचा आहे.