समुद्रपूर: कवडापूर शेत शिवारात वाघीण व पिलल्याचा वावर: शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण:सतर्कतेच वनविभागाचे आवाहन
समुद्रपुर तालुक्यातील कवडापुर शेत शिवारात वाघीण व पिल्ले दिसताच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी केले आहे.गेल्या वर्षभऱ्यापासुन वाघीण आपल्या तिन पिल्ल्यांसह खुर्सापार जंगलात वास्तव्याने असुन हि वाघीण व पिल्ले अधुन मधुन जंगल सोडून शेत शिवारात फटका मारत असते अशातच भर दिवसा शेतकर शेतात काम करीत असताना अचानक हि वाघिणी तिन पिल्यासह दिसताच वनविभागाला माहिती देण्यात आली.