विशेष पूजाअर्चना या माता मंदीर देवस्थानात मोठ्या भक्तीभावाने करण्यात येते. दि. ७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत पहाटे ५:३० वाजता नित्यनेमाने महिलांची काकड आरती सुरू असते. माता मंदीर देवस्थान राजुरा जवाहर नगर महिला माता सेवा समिती, माता मंदीर समिती, युवक समितीच्या वतीने दरवर्षी कार्तिक पौर्णिमा महोत्सव साजरा करीत असते. आज दि ५ नोव्हेंबर ला पहाटे ५ वाजता महोत्सवाची सुरुवात झाली.