संग्रामपूर: सोनाळा टुनकी रस्त्यावर केळीने भरलेला आयशर ट्रक उलटला २ मजूर ठार, ४ जण जखमी
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा टुनकी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ केळीने भरलेला आयशर मिनी ट्रक पलटी होऊन २ ठार व ४ जखमी झाल्याची घटना ११ आक्टोबर रोजी रात्री घडली. या अपघातातील मृतक हे अंजनगाव सुर्जी येथील मजूर असल्याची माहिती १२ आक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सोनाळा पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.