दिवाळीच्या उत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना या आधी देखील घडलेल्या आहे. 20 ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता च्या सुमारास एक वायरल होत असलेला व्हिडिओ हाती आला आहे हा व्हिडिओ पोलीस लाईन टाकळी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस लाईन टाकळी येथे पोलिसांचे क्वार्टर आहे. पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकळी येथील कॉटर नंबर 286 मध्ये आधी थोड्या प्रमाणात आग लागली आणि नंतर सिलेंडर ब्लास्ट झाले. सिलेंडर ब्लास्ट होण्याची ही घटना एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.