८ नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गणेश पेठ येथील शुक्रवारी तलाव परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेला व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्या आहे या व्यक्तीचे वय ७४ वर्षे सांगण्यात आले आहे त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पोलीस स्टेशन गणेश पेठ येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.